No Result
View All Result
6 Mar 2024 (Odisha Tazanews) Pune:-> अभिनेता प्रसाद विलास सुर्वे यांनी ए.बी.पी माझा विरुध्द मानहानीचा दावा पुणे जिल्हा न्यायालयात दाखल केला असून, तो न्यायालयात प्रस्तावित आहे. अभिनेता प्रसाद विलास सुर्वे यांनी ए.बी.पी माझा वृत्तवाहिनी विरोधात त्यांना न्याय मिळेल या उद्देशाने पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात रक्कम रू.१० कोटीचा मानहानीचा दावा व नुकसान भरपाईचा दावा अॅड. सत्यजीत कराळे पाटील यांच्यामार्फत दाखल केलेला असून, सदरची सुनावणी मे. न्यायालयात दि.०१/०३/२०२४ रोजी झालेली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना अॅड. सत्यजित कराळे पाटील म्हणाले की, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ या संस्थेला मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी रिट पिटीशन नं. २९११/२०२२ मध्ये पुणे येथे घडलेल्या मानाचा मुजरा या कार्यक्रमात रक्कम रु.१०,७८,५९३/- रूपयांची अफरातफर केल्याबद्दल माझी अध्यक्ष प्रसाद सुर्वे तसेच संचालक अलका कुबल, प्रिया बेर्डे यांच्यासह इतर संचालकांना दंड केला. उच्च न्यायालयाने शिक्षा सुनाविलेले प्रसाद सुर्वे हे सन २०१० साली अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष होते.
सदर शिक्षेची बातमी अनेक वृत्तपत्र व वृत्तवाहिनीवरून प्रसारीत झालेली होती हि बातमी ए.बी.पी माझा या वृत्तवाहिनीने देखील प्रसारित केली होती. परंतु या बातमीमध्ये शिक्षा सुनाविलेले प्रसाद सुर्वे यांच्या ऐवजी चित्रपट अभिनेता प्रसाद विलास सुर्वे या फोटो झळकुन ती बातमी दिवसभर प्रसारित केली. सदर दाव्यामध्ये मा. न्यायाधिश “ जी.आर. डोरनलपल्लेसाहेब ” प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारीयांनी ए.बी.पी माझा विरुध्द कारवाई करण्याचे व ए.बी.पी माझा चे कार्यकारी संपादक श्री. राजीव खांडेकर यांना दि.

१५/१२/२०२३ रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश पारित केले होते. सदर आदेशानुसार ए.बी.पी माझा व राजीव खांडेकर यांच्या वतीने त्यांचे वकीलांनी न्यायालयात हजेरी लावली. परंतु कोणतेही म्हणणे न्यायालयात दाखल केले नाही. तसेच त्यापुढील दि.२४/०१/२०२४, दि.३०/०१/२०२४ व दि.०१/०२/२०२४ रोजी ए.बी.पी माझा व राजीव खांडेकर यांच्या वतीने त्यांचे वकील व आरोपी राजीव खांडेकर सतत गैरहजर राहिल्यामुळे मा.न्यायालयाने त्यांना रक्कम रू.१०,०००/- चे जामिनपात्र वॉरंट काढले असून,सदर प्रकरणाची पुढील सुनावणी दि.१०/०४/२०२४ रोजी ठेण्यात आलेलीआहे.
सदर प्रकरणाकडे चित्रपट व पत्रकारीता क्षेत्रातील सवचिच लक्ष वेधले आहे. परंतु ए.बी.पी माझा च्या चुकीच्या वर्तणामुळे माझे पक्षकार अभिनेता प्रसाद विलास सुर्वे यांचे भविष्य धोक्यात आले आहे असे फिर्यादी प्रसाद विलास सुर्वे यांचे वकील अॅड. सत्यजीत कराळे पाटील यांनी प्रकरणाची अधिक माहिती देताना नमूद केले.

No Result
View All Result