No Result
View All Result
14 October 2023 (Odisha Tazanews) Pune :-> विश्रांतवाडी चौकातील उड्डाणपुलासाठी ६२ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी.आळंदी रस्त्यावरील विश्रांतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपुल उभारण्यासाठी मा.

आमदार सुनील टिंगरे यांनी सातत्याने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महापालिकडे पाठपुरावा केला होता. अखेर या प्रयत्नाना यश आले असून महापालिकेच्या एस्टीमेट कमिटीच्या बैठकीत विश्रांतवाडी येथील उड्डाणपुलाच्या ६२ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

लवकरच या पुलाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया निघून प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल. पुलाचे काम पूर्ण झाल्यावर आळंदी रस्ता, धानोरी रस्ता आणि विमानतळ रस्ता यासर्वाकडे जाणाऱ्यांचा मार्ग निश्चितपणे सुकर होईल.

No Result
View All Result