No Result
View All Result
Pune (Odisha Tazanews) Pune :-> मराठी चित्रपटांविषयी सगळ्यात मोठी तक्रार ते म्हणजे प्रोडक्शन वॅल्यू. बजेट कमी असल्याने दिग्दर्शकाला आहे त्यात भागवाव लागायच त्यामूळे सेट, एक्शन, व्हीएफएक्स आणि सिनेमॅटोग्राफी सारख्या गोष्टींवरती त्याचा वाईट परिणाम व्ह्यायचा पण आता ते दिवस जाताना दिसत आहेत.

सैराट, बाईपण भारी देवा आणि नूकतच आलेल्या राजा शिवाजीने अक्षरशः बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घालत १०० कोटींचा गल्ला पार केला. आता त्यात आणखीन एका चित्रपटाचे नाव जोडणार आहे तो म्हणजे घबाडकूंड. मराठीतल्या चित्रपट यूनिव्हर्स मधील पहिला चित्रपट. हाय प्रोडक्शन, जबरदस्त एक्शन, उच्च प्रतिच ग्राफिक्स आणि मराठीतील मल्टीस्टारकास्ट याचा सूरेख संगम म्हणजे घबाडकूंड.
मराठीतल्या दंतकथेवर आधारित मराठी यूनिव्हर्समधील पहिला चित्रपट होण्याचा मान घबडकूंडला मिळणार आहे. याचा टीजर नूकताच लॉंच झाला पाहून अक्षरशः अंगावर काठे तर आलेच आणि एक मराठी चित्रपटांचा रसिक म्हणून अभिमानाने छाती फूगली.

देवदत्त नागे यांची बॉडी आणि खास लूक मराठी प्रेक्षकांना भूरळ घालणार आहे. सोबत संदीप पाठकच भित्र पात्र दिल्या आणि तिची सूंदर नाजूक अशी बायको सोनी जी स्वप्नातही दिल्याला घाम फोडते अशी अनेक रोचक आणि भीतीदायक पात्रे घबाडकूंड मधे आहेत. देवदत्त नागे, संदीप पाठक, प्राजक्ता हनमघर, वैष्णवी कल्याणकर, कूशल बद्रिके, शशांक शेंडे यांसारखी जबरदस्त कास्ट आहे.

प्रीतम एसके पाटील दिग्दर्शक असून डॉ. रसिक कदम निर्माते आहेत. कथा प्रितम एसके पाटील आणि अक्षय धर्मपाल यांनी लिहली असून पटकथा संजय नवगिरे आणि अक्षय धर्मपाल यांनी लिहली आहे. छायाचित्रकार योगेश कोळी असून संकलन सौमित्र धारासूरकर आणि तितिक्षा धारासूरकर यांनी केले आहे. येत्या 19 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.

No Result
View All Result