No Result
View All Result
10 December 2023 (Odisha Tazanews) Pune :-> महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड परिसरात आज शुक्रवारी एका मेणबत्ती बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आज लागली. या आगीत किमान सहा जणांचा मृत्यू झाला असून, आठ जण जखमी झाले आहेत.

या आगीत आणखी काही कामगार अडकल्याची माहिती आहे. तळवडे येथील मेणबत्ती गोदामाला ही आग लागली असून, पोलीस तपास करीत आहेत. या आगीवर अग्निशमन दलाचे जवान नियंत्रण मिळवत असून, सात ते आठ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल आहेत. आत्तापर्यंत सहा मृतदेह बाहेर काढण्यात आलेल्या आहेत, आणखी कामगारांचा शोध सुरु आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, तळवडे येथील कारखान्याला दुपारी अडीचच्या सुमारास Pune factory fire आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली. कारखाना वाढदिवसाच्या उत्सवात वापरल्या जाणाऱ्या मेणबत्त्या बनवतो.

सध्या आग विझवण्यात आली असून, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. जखमींना पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या कारखान्यात 25 कामगार काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

No Result
View All Result