No Result
View All Result
१० सप्टेंबर २०२३ (ओडिसा ताजा न्यूज़ ) पुणे :-> गणेश उत्सवाची जोरदार तयारी सर्व मंडळांकडून सुरु झाली आहे. असेच एक पुण्यातील नामवंत मंडळ म्हणजे “शास्त्रीनगरचा राजा मंडळ (ट्रस्ट)” येरवडा पुणे. या मंडळाची स्थापना १५ ऑगस्ट १९८८ साली झाली. मंडळाचे अध्यक्ष मा. नौशादभाई शेख यांनी आपले मंडळ मोठे करण्यासाठी खूप झटले आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने स्वखर्चातून गाणेच मंदिराची स्थापना शास्त्रीनगर वसाहतीमध्ये केली. मा. नौशादभाई हे गणपती बाप्पाचे खूप मोठे भक्त.

त्यांनी गणेश उत्सवाच्या माध्यमातून रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी , मोफत चश्मेवाटप, मोफत आरोग्य तपासणी असे अनेक समाजकार्य केले. तसेच नौशाद भाई यांचे सामाजिक कार्य खूप मोठे आहे, शास्त्रीनगर सह्याद्री हॉस्पिटल येथील रुग्णांसाठी रुग्णांचे नातेवाईक यांच्यासाठी अहोरात्र तातडीची लागेल ती विनामूल्य मदत करतात,

लोकांचे आशीर्वाद आणि मित्रांचे प्रेम हीच माझी शिदोरी असे ते नेहमी म्हणतात, त्यांच्यामुळेच शास्त्रीनगरचा राजा मंडळ (ट्रस्ट) चा सार्वजनिक गणेशोत्सव डोळे दिपवणारा असतो. यंदाचा गणेश उत्सवाचीही मोठ्या उत्सहाने साजरा करण्याचे ठरवले आहे आणि त्याची जोरदार तयारी सुरु झाली आहे.


No Result
View All Result