18 December 2023 (Odisha Tazanews) Pune (Vishrantvadi) :-> काल दि. १७ डिसेंबर रोजी आळंदीहून विश्रांतवाडी कडे जाणाऱ्या कळस जवळील रस्त्यावर माल वाहतूक करणारा १२ चाकी ट्रकचा अपघात झाला.

चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक रस्त्यामध्ये असणारे लोखंडी दुभाजकावर धडकला व दुभाजक तोडून दुसऱ्या लेन मध्ये घुसला. ट्रक चा वेग जास्त नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच जास्त नुकसान घाले नाही.

परंतु या ट्रक मुळे वाहतूक कोंडी झाली होती. पुणे महानगर पालिका वाहतूक सेवा यांच्याकडून दुभाजक व सांडलेले ऑइल क्लिअर केले. या अपघातामुळे ट्रक चालू होत नसल्याकारणामुळे त्यामधील माल दुसऱ्या ट्रक मध्ये हलवून ट्रक हलवण्याचे काम चालू आहे .














