No Result
View All Result
25अक्टूबर (ओडिशा ताजा न्युज ) पूने :-> Jejuri : जेजुरीगडावर दसऱ्यानिमित्त मोठ्या संख्येनं भाविक दाखल झाले होते. जेजुरीमध्ये मंगळवारी सायंकाळी श्री खंडोबारायांचा पालखी सोहळा सिमोल्लंघनासाठी गडकोटातून बाहेर पडला.

दसऱ्याच्या निमित्त संपूर्ण डोंगरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून, रात्रभर हा पालखी सोहळा चालतो. जेजुरी येथील खंडोबा गडावर मंगळवारी मर्दानी दसऱ्याच्या सोहळ्याला सुरुवात झाली. येथील दसरा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक जेजुरीत दाखल झाले होते.

व्यवसायानिमित्त गावाबाहेर गेलेले जेजुरीकरही दसऱ्यानिमित्त गडावर येऊन सोहळ्यात सहभागी होतात. दसऱ्यादिवशी खंडोबा गडासह मूळ मंदिर कडेपठार येथून देवाची पालखी सीमोल्लंघनासाठी काढली जाते.

पालखी सोहळ्याच्या प्रस्तावनावेळी मोठ्या प्रमाणावर भंडाऱ्याची उधळण केली जाते.या काळात रात्रीच्या दरम्यान पूर्ण डोंगरावर विद्युत रोषणाई केलेली असते. रमणा या परिसरात जेजुरी गडावरील आणि कडेपठारावरील पालख्यांचा देवभेट सोहळा रंगतो. या काळात सलग एक तास फटाक्यांची आतिषबाजी केली जाते.

No Result
View All Result