१९ अक्टूबर (ओडिशा ताजा न्युज ) पूने / कोल्हापूर :-> मद्यधुंद अवस्थेत भरधाव गाडी चालवत नऊ वाहनांना धडक दिल्याने कोल्हापुरात भीषण अपघात घडला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले आहे. या अपघातानंतर संतप्त जमावाने मद्यधुंद अवस्थेतील चालकाला बेदम चोप दिला. ही धक्कादायक घटना कोल्हापुरातील कसबा बावडा ते सीपीआर चौककडे जाणाऱ्या रोडवर महावीर कॉलेज समोर काल रात्री दहा ते साडेदहा वाजताच्या सुमारास घडली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, जीएसटी विभागातील एसयूव्ही चारचाकी गाडी क्रमांक MH10EA9495 ही कार चालक ऋषिकेश बाबुराव कोतेकर (वय २९ वर्ष, रा. बुवा चौक, शिवाजी पेठ) हा मद्यपान करून कसबा बावडाकडून सीपीआर रुग्णालयाच्या दिशेने येत होता. तो मोठ्या प्रमाणात नशेत असल्याने भरधाव वेगाने येत रमणमळा ते मेरी वेदर मैदान दरम्यान दोन दुचाकींना धडक दिली. यानंतर त्याने गाडी न थांबवता आणखी वेगाने तो महावीर कॉलेज चौकात आला.

