नवले पुलाजवळ भीषण अपघात. ४ जणांचा जागीच मृत्यू

18th October 2023 (Odisha Tazanews) Pune :->नवले पुलाजवळ पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. कंटेनर आणि ट्रकच्या अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना काल सोमवारी साडेआठच्या सुमारास घडली. स्वामी नारायण मंदिराजवळ कंटेनर उभा होता. यावेळी साताऱ्याच्या दिशेने आलेला ट्रक कंटेनरला धडकला. यामुळे ट्रकने पेट घेतला. ट्रकमधील चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

दुर्घटनेत दोघे जण जखमी झाले आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मृत्यूमुखी पडलेल्या चार जणांची ओळख पटलेली नाही, पण ते एकाच कुटुंबातील असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हे सर्व ट्रकच्या कॅबिनमध्ये बसले होते.

घटनास्थळीच चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. यात एक महिला आणि लहान मुलाचा समावेश आहे. अपघाताची सूचना मिळतात अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान घटनास्थळी पोहोचले होते. अपघातामुळे या मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पण, पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

Exit mobile version