अभिनेता प्रसाद सुर्वे यांची न्यायालयात धाव

११ सप्टेंबर २०२३ (ओडिसा ताजा न्यूज़ ) पुणे :-> अभिनेता प्रसाद सुर्वे यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीविरोधात त्यांना न्याय मिळेल या उद्देशाने पुणे सत्र न्यायालयात १० कोटी रुपयांचा मानहानीचा व नुकसान भरपाईचा दावा ॲड. सत्यजित कराळे पाटील यांच्यामार्फत दाखल केला असून, लवकरच त्याची सुनावणी होणार आहे.

याबाबत अधिक माहिती देताना ॲड. सत्यजित कराळे पाटील म्हणाले, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ या संस्थेला मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी रिट पिटिशनमध्ये पुणे येथे घडलेल्या मनाचा मुजरा या कार्यक्रमात अफरातफर केल्याबद्दल माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे तसेच इतर संचालकांना दंड केला.

उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावलेले सुर्वे हे २०१० साली अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष होते. सदर शिक्षेची बातमी अनेक वृत्तपत्र व वृत्तवाहीवरुन प्रसारित झालेली होती. हि बातमी ए.बी.पी. माझा या वृत्तवाहिनीने देखील प्रसारित केली. परंतु या बातमीची शिक्षा सुनावले प्रसाद सुर्वे यांच्या ऐवजी चित्रपट अभिनेता प्रसाद सुर्वे यांचा फोटो दाखवून ठी बातमी प्रसारित केली.

Exit mobile version